आधार पीव्हीसी कार्ड कसं मिळवायचं?

  • आधार पीव्हीसी कार्ड हवं असल्यास आधार कार्ड धारक https://myaadhaar.uidai.gov.in/genricPVC या वेबसाईटला भेट देऊन आवश्य असलेली माहिती भरुन अर्ज सादर करु शकतो.
  • यासाठी त्यांना आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक नोंदवावा लागेल, त्यासह कॅप्चा, फोन नंबर रजिस्टर असल्यास ओटीपी येईल तो नोंदवून 50 रुपये शुल्क भरुन आधार पीव्हीसी कार्ड मागवता येईल.
  • ज्यांचा फोन नंबर नोंदवलेला नसेल त्यांना पर्यायी क्रमांक नोंदवावा लागेल. अशा वेळी त्यांना आधार कार्ड प्रिंट करण्यापूर्वी पाहता येणार नाही.
  • आधार पीव्हीसी कार्डसाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, यूपीआय आणि पेटीएमद्वारे शुल्क भरता येईल.
  • आधार पीव्हीसी कार्डसाठी अर्ज दाखल केल्यानंतर ते पुढील पाच दिवसांनंतर स्पीड पोस्टानं संबंधित आधार कार्ड धारकाच्या घरी पाठवलं जातं.