केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव भत्ता

सातव्या वेतन आयोगांतर्गत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना DA वाढीचा थेट लाभ मिळतो. जानेवारी २०२४ पासून महागाई भत्ता ५०% पर्यंत वाढला तर जून महिन्यात AICPI निर्देशांकात १.५ अंकांची मोठी वाढ झाली ज्यामुळे महागाई भत्त्याची संख्याही वाढली आहे. जानेवारी ते जून २०२४ दरम्यान आलेल्या AICPI-IW निर्देशांकाच्या आकड्यांवरून जुलैपासून कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात ३% वाढ होताना दिसत आहे. जूनच्या AICPI निर्देशांकात १.५ अंकांची उसळी दिसून आली जो मे महिन्यात १३९.९ अंकांवर होता तर आता १४१.४ पर्यंत वाढला. अशाप्रकारे आता एकूण डीए स्कोअर ५३.३६ झाला आहे म्हणजे या वेळी महागाई भत्त्यात ३% वाढीची घोषणा केली जाईल. जानेवारीमध्ये निर्देशांक क्रमांक १३८.९ अंकांवर होता, ज्यामुळे डीए ५०.८४% झाला.